जळगांव, दि. 13 :- जिल्हयातील युवकांनी एचआयव्ही / एडस च्या लढयामध्ये
सक्रीय सहभाग घेऊन नवीन एचआयव्ही / एडस संसर्ग होणार नाही याची दक्षता घेण्याचे
आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले.ते युवा संकल्प अभियानांतर्गत
एचआयव्ही / एडस जनजागृती कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करत होते
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.एन.लाळीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
शिवाजी पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर, दिशा बहुउद्देशीय संस्थेचे
विनोद ढगे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राजूरकर यांनी यावर्षीच्या जागतिक एडस दिनाचे घोषवाक्य
“शून्य गाठायचा आहे” याकडे
उपस्थित युवा वर्गाचे लक्ष
वेधून त्याकरिता सर्व युवकांनी एचआयव्ही / एडसच्या प्रतिबंधाकरिता शासनाकडून राबविण्यात
येणा-या मोहिमेत सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले तसेच महाविदयालयीन युवकांनी
एडसचे प्रमाण शून्यावर आणण्याकरिता नवीन एचआयव्ही संसर्ग होऊ नये, कलंक भेदभाव
शून्य करणे, व एडस मुळे होणारे मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणे आदि साठी कार्य
करावे, अशा मार्गदर्शक सूचना त्यांनी दिल्या.
जागतिक एडस दिनानिमित्त जिल्हा एडस नियंत्रण व प्रतिबंधक पथक, जिल्हा
सामान्य रुग्णालय व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशन यांच्या संयुक्त
विदयमाने युवकांसाठी युवा संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत
नटराज हॉल मध्ये गीत संगीत आर्केस्ट्रा व एडसबाबत जन जागृती, पथनाटय आदि
कार्यक्रमाव्दारे युवकांना प्रबोधन करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमांना जळगांव
शहरातील सर्व महाविदयालयाचे विदयार्थी व शिक्षकांची उपस्थिती होती.
प्रारंभी कार्यक्रमास उपस्थित महाविदयालयीन युवकांना जिल्हाधिकारी राजूरकर
यांनी युवा संकल्प अभियानांतर्गत शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पहुरकर
यांनी केले तर आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एन. लाळीकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment