नागपूर, दि. 19 : ध्वजदिन निधी संकलनात
महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 20 कोटींच्या
वर ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट गाठलेले महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य
आहे. तसेच याही वर्षी महाराष्ट्र राज्य अग्रेसर राहील अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी व्यक्त केली.
जिल्ह्याच्या ध्वजदिन निधी 2012 चा संकलन
शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते रामगिरी या निवासस्थानी आज झाला.
त्यावेळी ते बोलत होते. निधी संकलनातून महाराष्ट्रातील माजी सैनिक व अपंग सैनिक,
त्यांच्या विधवा पत्नी व अवलंबितांच्या पुनर्वसनाच्या योजना चांगल्या रितीने
कार्यान्वित होऊ शकतील, असे सांगून जास्तीत जास्त ध्वजदिन निधी गोळा करण्याचे
मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.
याप्रसंगी
उत्कृष्ट निधी संकलनाबद्दल विभागीय आयुक्त बी.वेणुगोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी सौरभ
राव, लेफ्टनंट नितीन पांडे (इंडियन नेव्ही), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
वर्ष
2011 चे ध्वजदिन संकलनाचे सातारा, पुणे, जळगाव, अमरावती व नागपूर या जिल्ह्यांनी
त्यांना दिलेले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करुन प्रत्येकी एक-एक कोटींच्यावर ध्वज
दिन निधी संकलन केले आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्याने वर्ष 2011 चे उद्दिष्ट
126.36 टक्के पूर्ण करुन 1 कोटी 25 लाख 636 इतका निधी संकलीत केला असल्याचे आपल्या
प्रास्ताविकात सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल (निवृत्त)सुहास जतकर यांनी
सांगितले.
विंग
कमांडर (निवृत्त) एम.जे. हस्तक भारतीय वायुसेनेत 26 वर्षाच्या सेवे दरम्यान झालेल्या 1962, 1965 व 1971 च्या
युद्धात भाग घेऊन वायुसेनेत प्रशासकीय व सुरक्षा विभागात प्रशंसनिय कामगिरी करुन
1975 मध्ये सेवानिवृत्ती नंतर वयाच्या 88 वर्षामध्ये सुद्धा नागपूर येथील
झोपडपट्टीत राहणाऱ्या मजदूरांच्या के.जी. मध्ये शिकणाऱ्या मुलांच्या गणवेश,
पुस्तके व शिक्षणाचा खर्च ते पूर्ण करतात तसेच वृद्ध व परित्यक्ता महिलांसाठी असलेला
आंतरभारती आश्रम ते चालवितात. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी
जिल्ह्याचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे तसेच माजी विधानपरिषद सदस्य एस.क्यु.जमा. महाराष्ट्र
माजी सैनिक महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक कर्नल शि.ए. चावडे, भंडारा व गोंदिया
जिल्ह्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिपक निमसे, बुलढाणा जिल्ह्याचे
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर (नेव्ही) मिलिंद कुमार बडगे, वर्धा जिल्ह्याचे
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट धनंजय सदाफळ, सैनिकी अधिकारी कर्नल
के.सी.मूर्ती, कॅप्टन डि.एन.नरांजे, कॅप्टन गायकवाड, सार्जंट संदेश
सिंगलकर आदींसह माजी सैनिक, विधवा पत्नी आणि त्यांचे अवलंबित उपस्थित होते.
No comments:
Post a Comment