Friday, 14 December 2012

खेडी बु. च्या विद्यालयाची मान्यता रदद झालेली नसून केवळ सांकेतीक क्रमांक रदद


          जळगांव, दि. 14 :- महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक मंडळ नाशिक विभागीय मंडळ, नाशिकच्या कार्यक्षेत्रातील पार्वती देवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ, खेडी बु // ता. जि. जळगांव या संस्थेचे अधिनस्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खेडी बु // ची मान्यता रदद झालेली नसून केवळ विभागीय सचिव विभागीय मंडळ नाशिक मार्फत सदरच्या विद्यालयाचा सांकेतीक क्रमांक मे 1509007 रदद केलेला आहे. तरी सर्व शाळा प्रमुख, विद्यार्थी, पालक व संबंधितांनी सदरच्या विद्यालयाची मान्यता रदद झालेली नाही याची नोंद घ्यावी असे कळविण्यांत येत आहे.

No comments:

Post a Comment