महाराष्ट्र शासन 12 मार्च, 2012 ते 12 मार्च,
2013 हा कालावधी स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करीत
आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म देवराष्ट्रे (सध्या सांगली जिल्ह्यात) झाला
होता. राज्याच्या विकासात त्यांचे अमूल्य योगदान विचारात घेवून सांगली जिल्ह्यात
देवराष्ट्रे येथे असलेल्या सागरेश्वर वन्यजीवन अभयारण्यास ‘ यशवंतराव
चव्हाण सागरेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ असे नाव देण्यात येत
आहे, अशी घोषणा वन मंत्री डॉ.पतंगराव कदम यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे केली.
निवेदनात त्यांनी पुढे सांगितले, नवीन
घोषित यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीवन अभयारण्याच्या विकासासाठी रुपये 6 कोटी
खर्च करुन एक अद्ययावत निसर्ग माहिती केंद्र, पर्यटक सुविधा व वन्यजीवांच्या
संरक्षणाकरिता संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. या नवीन तयार होणाऱ्या निसर्ग
परिचय केंद्रास ‘यशवंतराव चव्हाण निसर्ग परिचय केंद्र’ असे
नाव देण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment