जळगांव, दि. 10 :- सशस्त्र सेना ध्वज दिन दि. 7
डिसेंबर रोजी देशभरात साजरा केला जातो. या दिवसापासून सर्व राज्ये आजी माजी
सैनिकांच्या कल्याणासाठी जनतेकडून निधी गोळा करतात. जनतेने सैनिकांप्रति त्यांनी
केलेल्या त्यागाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपल्या जिल्हयात जिल्हाधिकारी
श्री. ज्ञा.स.राजूरकर यांचे अध्यक्षतेखाली
व श्रीमती शीतल उगले मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद, जळगांव, श्री. जय
कुमार,(भा.पो.से) पोलीस अधिक्षक, जळगांव, श्री सोमनाथ गुंजाळ अप्पर जिल्हाधिकारी
जळगांव, यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच मेजर जनरल (निवृत्त ) व्ही.पी.पवार ,
ब्रिगेडिअर (निवृत्त) व्ही.इ. घोरपडे व ब्रिगेडिअर (निवृत्त) विजय नातू यांचे
विशेष उपस्थितीत ध्वजदिन 2012 निधी संकलनाचा शुभारंभ सोमवार दिनांक 12 डिसेंबर
2012 रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
येथे साजरा केला जाणार आहे.
या कार्यक्रमात जिल्हयातील युध्द
विधवा, वीरमाता / वीरपितांचा सत्कार करण्यात येणार आहे व माजी सैनिकांच्या गुणवंत
पाल्यांचा शिष्यवृत्ती देवून सत्कार केला जाणार आहे. तसेच मागील वर्षी ध्वजदिन
निधी संकलनाचे कामी उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना प्रोत्साहनपर
बक्षीस देवून गौरविण्यात येणार आहे. उपस्थितांना कार्यक्रमानंतर अल्पोहाराची
व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी माजी सैनिक
व त्यांचे कुटुंबियांनी तसेच ध्वजदिन निधी संकलनाचे कामी उत्कृष्ट कार्य
केलेल्या सर्व शासकीय / निम शासकीय अधिकारी व कर्मचा-यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कॅप्टन
मोहन कुलकर्णी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
No comments:
Post a Comment