जळगांव,
दि. 11 :- जळगांव डाक विभागातर्फे सेवानिवृत्त झालेल्या डाक कर्मचा-यांच्या पेन्शन
विषयी तक्रारी समजुन घेण्यासाठी 24 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 11.00 वाजता डाक
अधिक्षक जळगांव विभाग जळगांव यांचे कार्यालयात पेन्शन अदालत आयोजित करण्यात येणार
आहे.
जळगांव डाक विभागातील सेवानिवृत्त
कर्मचा-यांच्या पेन्शन विषयीच्या ज्या तक्रारींचे निवारण 6 आठवडयांच्या आत झालेले
नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या पेन्शन अदालत मध्ये दखल
घेतली जाईल असे टपाल खात्याच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत डाकघर अधिक्षक श्री
सु.मा.पाटील यांचेकडे संपर्क साधावा व आपली तक्रार दयावी असे सु.मा.पाटील अधिक्षक
डाकघर जळगांव यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment