Tuesday, 4 December 2012

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची कनीष्ठ लिपिक पदांची 16 डिसेंबर रोजी लेखी परीक्षा



 जळगांव, दि. 4 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व त्यांच्या अंतर्गत पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण (रत्नागिरी) या नऊ विभागीय मंडळात कनिष्ठ लिपिकांची रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी लेखी परीक्षा रविवार  दिनांक 16 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1.00 या वेळेत मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा  केंद्रावर आयोजित केली आहे. पात्र उमेदवारांना परीक्षेसाठी आवश्यक असणारे प्रवेशपत्र व सूचना  मंडळाच्या www.msbshse.ac.in या संकेतस्थळावर शनिवार दिनांक 1 डिसेंबर 2012 नंतर उपलब्ध  करुन देण्यात येईल. उमेदवाराने सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावरील सूचनांची पूर्तता करावी व सदर  प्रवेशपत्रासह परीक्षेस प्रविष्ठ व्हावे, असे आवाहन बी.एस.सुर्यवंशी विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च  माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment