चाळीसगांव दि. 31:- एकात्मिक बालविकास सेवा योजना, चाळीसगांव
अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या रिक्त पदासाठी तालुक्यातील इच्छुक
उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, चाळीसगांव यांनी केले
आहे.
तालुक्यातील
हिंगोणे खु., वाघळी, जावळे, आंबेहोळ, लोंजे, वडाळा, निमखेडी, विष्णु नगर, तळेगांव
तांडा, दडपिंप्री, पिंपळवाड म्हाळसा, आणि शिवापुर येथील रिक्त असलेल्या अंगणवाडी
सेवीका व मदतनिस पदासाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज विक्री ही दिनांक 07.01.2013 ते
11.01.2013 या कालावधीत होणार असून सदर परिपुर्ण भरलेले अर्ज हे दिनांक 14.01.2013
ते 18.01.2013 (सुटीचे दिवस वगळुन) या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत.
तरी तालुक्यातील अधिकाधिक उमेदवारांनी सदर
पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, चाळीसगांव (प्रकल्प नं-2)
यांनी केले आहे.
* * * * *
No comments:
Post a Comment