मुंबई, दि. 31 : महाविद्यालयीन, विद्यापीठ, अभियांत्रिकी
शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण/ प्रशिक्षण, चित्रकला/ उपयोजित कला या क्षेत्रात
अध्ययन किंवा अध्यापनासह शैक्षणिक क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या
शिक्षकांचा यथोचित गौरव व्हावा, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत राज्यातील
शिक्षकांचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. सन 2012-13 चे
शिक्षण पुरस्कार निवड प्रक्रियेसाठी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या
कार्यक्रमानुसार पुरस्कारांसाठी दिनांक 5 जानेवारी 2013 पर्यंत प्रस्ताव प्राप्त
होणे आवश्यक आहे.
संचालक व कुलसचिव यांनी प्राप्त प्रस्ताव / अर्जांची शासन
निर्णयातील प्राथमिक अटीनुसार तपासणी करावी व सदर प्रस्ताव/अर्ज प्रमाणित
करुन शिक्षकनिहाय प्रस्ताव दिनांक 10
जानेवारी 2013 पर्यंत छाननी समितीकडे
पाठवावयाचे आहे. छाननी समितीने प्रस्ताव दिनांक 15जानेवारी 2013 पर्यंत शासनाकडे /
राज्यस्तरीय निवड समितीकडे सादर करावयाचे आहे. राज्यस्तरीय निवड समितीची सभा
दिनांक 16 ते 24 जानेवारी 2013 दरम्यान आयोजित केली जाणार असून दिनांक 26 जानेवारी
2013 रोजी राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत तर राज्य शिक्षक पुरस्कार
सोहळा दिनांक 5 सप्टेंबर 2013 रोजी आयोजित केला जाणार आहे, असे विभागामार्फत
कळविण्यात आले आहे.
या पुरस्काराकरिता यापूर्वी प्राप्त झालेले प्रस्तावसुध्दा विचारात
घेण्यात येणार आहेत.कोणत्याही परिस्थितीत निश्चित करुन दिलेल्या कार्यक्रमानुसार
प्रस्ताव राज्यस्तरीय समितीपुढे सादर करण्याची जबाबदारी प्रत्येक स्तरावरील छाननी
समितीच्या अध्यक्षांवर सोपविण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment