मुंबई, दि. 12 : विविध प्रशासकीय विभागांनी आपल्या विभागात करावयाची भरती
प्रक्रिया विनाविलंब होण्यासाठी कॅव्हेट दाखल करावे, असे निर्देश सामान्य प्रशासन
विभागाने दिले आहेत.
विविध विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठविलेल्या मागणीपत्राच्या
आधारे आयोगाकडून जाहिरात दिल्यानंतर व
निवड प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जे उमेदवार जाहिराती मधील अटी पूर्ण करू शकत
नसल्याने संबंधित पदासाठी अर्ज करु शकत नाहीत अशा उमेदवारांकडून संबंधित जाहिरातीस
न्यायालयात आव्हान देण्यात येते.
न्यायालयाकडून या जाहिरातीस स्थगिती देण्यात येते. त्यामुळे निवड प्रक्रिया पार पाडली जात नाही
अशा प्रकरणात संबंधित विभागाचे, लोकसेवा आयोगाचे म्हणणे ऐकूण घेतल्याशिवाय संबंधित
प्रकरणी स्थगिती मिळू नये याकरीता कॅव्हेट दाखल करावे.
या जाहिरातीच्या अनुषंगाने
निवडप्रक्रिया झाल्यावर तसेच गुणवत्ता यादी तयार केल्यावर देखिल, लोकसेवा आयोगाचे
म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय या निवड प्रक्रीयेस तसेच गुणवत्तायादीस स्थगिती मिळू नये
याकरिता लोकसेवा आयोगाने अशा प्रकरणात कॅव्हेट दाखल करण्याची कार्यवाही करावी, असे
निर्देश सामान्य प्रशासन विभागाने 23 नोव्हेंबर 2012 रोजीच्या परिपत्रकाद्वारे दिले
आहेत.
No comments:
Post a Comment