नागपूर दि. 14: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध शासकीय
योजनांचा लाभ त्यांना विनाविलंब घेता यावा, या दृष्टीने ठाण्यात समन्वय प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र वितरण अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानातंर्गत तयार झालेल्या बाराशे
ओळख-पत्रांपैकी प्रातिनिधीक स्वरुपात पाच ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्रांचे वितरण आज उपमुख्यमंत्री अजित
पवार यांच्या हस्ते विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या नागपूर
येथील विधानभवनाच्या दालनात
करण्यात आले. उपसभापती वसंत डावखरे, समन्वय प्रतिष्ठान ठाणेचे अध्यक्ष आमदार निरंजन
डावखरे, आमदार अनिल
भोसले व आमदार विलास
लांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांना विनाविलंब मिळाला पाहिजे. त्यादृष्टीने हाती घेण्यात आलेली ही मोहीम अतिशय स्तुत्य असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment