सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत
राज्यात कार्यरत असलेल्या दंत विभागाचे बळकटीकरण करण्यासाठी राज्यस्तरावर मौखिक
आरोग्य सेवा कक्ष निर्माण करणे, जिल्हा तसेच 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या दंतशल्य चिकित्सा
विभागाचे श्रेणीवर्धन करणे, 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात तसेच ग्रामीण
रुग्णालयात नव्याने दंतशल्य चिकित्सा विभाग
निर्माण करणे तसेच यासाठी 1063 पदांची निर्मिती करण्यास 25 जुलै 2012 च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व
कुटुंब कल्याण मंत्री सुरेश शेट्टी यांनी आज विधानपरिषदेत यासंदर्भातील
प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
सदस्य सर्वश्री विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, हेमंत टकले, रमेश शेंडगे यांनी प्रश्न विचारला होता.
No comments:
Post a Comment