जळगांव, दि. 16 :- जळगांव जिल्हयातील
राष्ट्रीयकृत बँकांनी माहे नोव्हेंबर – 2012 चे निवृत्ती वेतन अदा करतांना राज्य
सरकारी निवृत्ती वेतन धारकांकडुन प्राप्त केलेले हयातीचे दाखले जिल्हा कोषागार
कार्यालयास पाठविणे आवश्यक होते. तथापि ब-याच बॅकांनी हयातीचे दाखले पाठविले
नसल्याचे दिसुन येत आहे. तरी राज्य सरकारी निवृत्ती वेतन धारकांचे हयातीचे दाखले
संबंधित बँकानी तात्काळ जिल्हा कोषागारास पाठवावेत. त्याच प्रमाणे सर्व निवृत्ती
वेतन धारकांना पुन्हा एकदा कळविण्यात येते की, त्यांनी हयातीचे दाखले संबंधीत बँकेस
कोषागारात त्वरीत सादर करावेत अन्यथा माहे डिसेंबर – 2012 चे निवृत्ती वेतन
संबंधितांच्या खात्यात जमा केले जाणार नाही असे आवाहन श्री. सु. ब. सुर्यवंशी,
जिल्हा कोषागार अधिकारी, जळगांव यांनी केले आहे.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment