जळगांव,
दि. 6 :- युवकांच्या विविध कलागुणांना वाव देवून त्यांच्यातील सुप्त कलागुणांना
युवक महोत्सवाच्या माध्यमातुन प्रदर्शित करण्याची संधी क्रीडा व युवकसेवा
संचालनालय, व्दारा उपलब्ध करुन दिली जात आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व
शाहीर गंगाधर शिंपी प्रतिष्ठान, जळगांव यांच्या संयुक्त विदयमाने युवक महोत्सव दि.
11 डिसेंबर 2012 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी
श्रीमती. सुनंदा पाटील यांनी दिली.
या युवक महोत्सवात लोकनाटय, लोकगीत,
एकांकिका, बासरी, तबला, वीणा, मृदंग, हार्मोनियम, शास्त्रीय नृत्य, वक्तत्व अशा
एकूण दहा बाबीचा समावेश आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, जळगांव येथुन व्यक्तिश: प्राप्त करुन घेवून आवश्यक त्या कागदपत्रासह दि.
10 डिसेंबर 2012 पर्यंत सादर कराव्यात. युवक महोत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा
संकुल, जळगांव या ठिकाणी होणार आहे.
जिल्हास्तर विजयी संघ उत्कृष्ट
कलाकाराची निवड करुन त्यांना विभागस्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयस्तरीय युवा महोत्सवात
सहभागी होण्यासाठी पाठविण्यात येईल. स्पर्धकांना जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयातुन कार्यालयीन वेळेत प्रवेशिकेचा विहित नमुना प्राप्त करुन घेवून
सदरच्या विहित नमुन्यातच प्रवेशिका सादर करावी. तसेच वयाबाबतचा पुरावा जसे
बोनाफाईड प्रमाणपत्र , एस.एस.सी. प्रमाणपत्र व राहिवासी प्रमाणपत्र आदी
प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
या युवक महोत्सवात जास्तीत जास्त शाळा
/ महाविदयालयाच्या संघांनी भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, श्रीमती.
सुनंदा पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालय, जळगांव
तसेच सोमनाथ शिपी मो.न. 9850935064 व प्रवीण कोंडेकर , क्रीडा अधिकारी 9422900111
यांचेशी संपर्क साधावा असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेले आहे.
No comments:
Post a Comment