जळगांव, दि. 6 :- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य
अभियान, जळगांव जिल्हा रुग्णालय व राज्य आरोग्य सोसायटी महाराष्ट्र शासन अंतर्गत
आदिवासी व ग्रामीण भागातील जनतेसाठी दि. 8 डिसेंबर ते 11 डिसेंबर या कालावधीत
चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत सर्व रोग निदान, दंत व शस्त्रक्रिया
शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी सदरच्या
मोफत शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन वैदयकीय अधिक्षक डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर व जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. एस.एन. लाळीकर (गायकवाड) यांचे मार्गदर्शनाखाली होणा-या या
शिबिरात ॲपेंडिक्स, हर्निया, मुतखडा, मुळव्याध, फिशर, भगंधर, गर्भपिशवी, लहान
मुलांच्या व दातांच्या शस्त्रक्रिया तसेच शरीरावरील गाठींच्या शस्त्रक्रिया
करण्यात येणार आहे.
शिबिराच्या
पहिल्या दिवशी दि. 8 डिसेंबर रोजी रुग्णांची तपासणी भाऊसाहेब हिरे वैदयकिय
महाविदयालय धुळे व जळगांव येथील विशेष तज्ञ डॉक्टर करतील, दि. 9 ते 10 डिसेंबर
रोजी गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येईल व 11 डिसेंबर रोजी रुग्णांची शस्त्रक्रिया
पश्चात तपासणी करण्यात येईल, या शिबिराचा आदिवासी व ग्रामीण भागातील गरजू
रुग्णांनी लाभ घ्यावा व उपजिल्हा रुग्णालय चोपडा तसेच गोरगावले, अडावद, चहार्डी,
लासूर, हातेड, वैजापूर व धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नांव नोंदणी
करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment