जळगांव, दि. 31 :- धरणगांव येथील विविध
विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे हस्ते करण्यात आले.
यात प्रामुख्याने रुपये 5.84 लक्ष खर्च
करुन शिवाजी चौक ते पिलू मशीद जैन गल्ली
रस्त्याचे डांबरीकरण 9.45 लक्ष रु. चे तेली तलाव शिवाजी तलाव ते बालाजी मंदिर रस्त्याचे
डांबरीकरण, वाचनालय व मुंजोबा पार समाजमंदिर बांधकाम करणे. धरणगांव येथील
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम व दिवाणी न्यायाधिश
यांच्या निवासस्थान बांधकामांचा शुभारंभ करुन बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या
आवार भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज करण्यात आला.
कार्यक्रमास धरणगावातील न. पा. चे नगरसेवक
आणि नागरिक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment