Thursday, 13 December 2012

जिल्हयातील ग्रामीण कारागीरांच्या कर्जाला माफी


            जळगांव, दि. 13 :- राज्य शासनाच्या दि. 17 नोव्हेंबर 2012 च्या निर्णयान्वये जळगांव जिल्हयातील ग्रामीण बालुतेदार कारागिरांकडील 31 मार्च 2008 पर्यंतच्या थकीत असलेल्या मुद्दल व व्याजाला माफी मिळणार असल्याचे जिल्हा ग्रामोदयोग अधिकारी यांनी कळविले आहे.
        सदर कर्ज माफी निर्णयानुसार 31 मार्च 2008 पर्यंत जळगांव जिल्हयातील बालुतेदार कारागिर सभासदांकडे मुद्दल व व्याज मिळून 4 कोटी 93 लाख 59 हजार रुपये थकबाकी आहे. या सर्व थकबाकीस वरील शासन निर्णयान्वये माफी मिळू शकते  परंतु 1 एप्रिल 2008 ते आज पावेतो सभासदांकडे थकीत असलेली सुमारे 40 लाख रु. भरणे आवश्यक आहे. ही रक्कम माफीच्या रक्कमे व्यतिरिक्तची थकीत आहे.
       सदरच्या रक्कमेचा भरणा झाल्याशिवाय संस्थांचे पुर्नजिवन व नवीन कर्जपुरवठा ठप्प होणार असल्याने थकबाकीदार कारागीरांनी कर्ज माफी व्यतिरिक्तची रक्कम भरण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोदयोग अधिकारी जळगांव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment