जळगांव, दि. 6 :- जिल्हा उदयोग केंद्रामधील शासनास केलेल्या प्रदानाची पावती पुस्तिका
अमळनेर ते जळगांव प्रवासा दरम्यान चोरीला गेली असून सदरच्या पुस्तिकेतील
पावती अथवा पावत्यांचा अनधिकृत व्यवहार जर कोणी केला असेल तर तो ग्राहय धरला जाणार
नसल्याचे प्रभारी महाव्यवस्थापक ज्ञा.ज.बागडे यांनी कळविले आहे.
सदरची
पावती पुस्तिका ही अंमळनेर ते जळगांव प्रवासादम्यान दि. 12 ऑगस्ट 2012 रोजी हरविली
असून त्याबाबतचा एफआयआर तत्कालीन उदयोग निरीक्षक प्रकाश घुगे यांनी अंमळनेर पोलिस
स्टेशनमध्ये दि. 13 ऑगस्ट 2012 रोजी नोंदविला आहे. सदर FIR नुसार पावती पुस्तिकेत क्रमांक 4092474 ते
4092600 पर्यंतच्या को-या न वापरलेल्या पावत्या असल्याचे श्री. बागडे यांनी
सांगितले आहे. सदरच्या पावती पुस्तिकेबदल तपास लागला नसल्याचे दि. 22 नोव्हेंबर
2012 रोजी अंमळनेर पोलिस स्टेशन कडून कळविण्यात आले आहे. म्हणून वरील क्रमांकाच्या
पावती / पावत्या जिल्हा उदयोग केंद्राचे तत्कालीन / कार्यरत अधिकारी / कर्मचारी व
इतर लोकांनी केलेले कोणतेही व्यवहार ग्राहय धरले जाणार नसल्याची माहिती श्री.
बागडे यांनी दिली तसेच सदरील पावत्या हया दि. 12 ऑगस्ट 2012 पासून रद्द करण्यात
येत असल्याचे त्यांनी सांगितले याची सर्व नागरिकांनी व संबंधितांनी नोंद घ्यावी
असे आवाहन त्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment