नागपूर, दि. 17 : केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील
वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमांच्या
प्रवेशासाठी एनईईटी ही प्रवेश परीक्षा शैक्षणिक वर्ष 2013-14 पासून घेण्यात
येणार आहे. या व्यतिरिक्त राज्यातील आयुर्वेद, युनानी, होमिओपथी, नर्सिंग व इतर
आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांचे प्रवेश
देखील एनईईटी मार्फत शैक्षणिक
वर्ष 2013-14 पासून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची
माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत
प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या
प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरुन घेण्यात
येणाऱ्या जेईई या प्रवेशपरीक्षा
प्रक्रियेत शैक्षणिक वर्ष 2014-15 पासून सहभागी होण्याचा निर्णय राज्य शासनाने
घेतला आहे, असेही त्यांनी लेखी उत्तरात
म्हटले आहे.
एनईईटी 2013 बाबत
विद्यार्थी व पालकांच्या माहितीसाठी दैनिक
वृत्तपत्रात तसेच संचालनालय, वैद्यकीय
शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांच्या
संकेतस्थळावर अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, परिपत्रकाद्वारे राज्यातील
सर्व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांची महाविद्यालये व विद्यापीठे यांनासुध्दा
संचालनालयामार्फत कळविण्यात आले आहे, अशीही माहिती त्यांनी उत्तरात दिली आहे.
शैक्षणिक वर्ष 2014-15 पासून राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या संयुक्त
परीक्षेच्या (जेईई) आधारे करण्यात येणार असल्याची अधिसूचना
प्रसिध्द करण्यात आली
असल्याचे त्यांनी लेखी उत्तरात
म्हटले आहे. अशीही माहिती त्यांनी दिली
आहे.
सदस्य
सर्वश्री डॉ. सुधीर तांबे, संजय दत्त,
श्रीमती अलका देसाई आदींनी
यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
No comments:
Post a Comment