Friday, 14 December 2012

माजी सैनिकांच्या पेन्शन बाबतच्या तक्रारींचे निवारण 27 व 28 डिसेंबर रोजी


            जळगांव, दि. 14 :- जिल्हयातील माजी सैनिक, विर पत्नी, विरमाता व विधवा यांना कळविण्यात येते की, अभिलेख कार्यालय BEG Kirkee  यांचे रेकॉर्ड तर्फे पेन्शन संदर्भात काही तक्रारी असल्यास त्यांचे निवारण करण्यासाठी अधिकारी येणार आहेत. तरी दिनांक 27 व 28 डिसेंबर 2012 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगांव येथे BEG Kirkee  च्या माजी सैनिकांनी त्यांचे  PPO, Discharge Book घेऊन सकाळी 10 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन कॅप्टन मोहन कुळकर्णी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment