जळगांव, दि. 10 :- जिल्हयातील
स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढील पाच वर्षाकरिता विकास कामासाठी आवश्यक असलेल्या
निधीबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे मार्फत वित्त आयोगाकडे पाठविण्याचे आवाहन
चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी केले. ते आज जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात अधिक-यांशी झालेल्या चर्चेत बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर
राजूरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, जिल्हा नियोजन
अधिकारी वि. शा. राणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल गायकवाड, अप्पर
जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ, उपजिल्हाधिकारी डॉ. संतोष थिटे, मनपा उपायुक्त
भालचंद्र बेहरे, जिल्हा प्रकल्प अधिकारी ( न. पा.) बी. टी. बावीस्कर, सर्व नगर
पालिका मुख्याधिकारी आदि उपस्थित होते.
श्री. डांगे पुढे म्हणाले की,
सप्टेंबर महिन्यात झालेल्या दौ-यात महानगरपालिका, चोपडा पंचायत समिती, तोंडापूर
ग्रामपंचायत, चाळीसगांव नगरपालिका, जिल्हा परिषद आदि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील
अधिकारी / पदाधिकारी यांनी विकास कामासाठी निधीची मागणी केली होती. परंतू त्यांचे
निधी मागणी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे मार्फत येणे अपेक्षित होते. ते प्रस्ताव
सदराच्या संस्थांनी तात्काळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
No comments:
Post a Comment