नागपूर, दि. 17 : मागासवर्गीय मुला-मुलींच्या
शिक्षणाची सोय व्हावी म्हणून जिल्हा व तालुकास्तरावर मुलांसाठी 60 आणि मुलींसाठी
40 अशी एकूण 100 शासकीय वसतीगृहे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार सन 2011-12 मध्ये 100 वसतीगृहांपैकी 51 वसतीगृहे शासकीय इमारतीत सुरु
करण्यात आली आहेत. उर्वरित 49 पैकी 29 ठिकाणी वसतीगृहाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे
आणि 20 ठिकाणी शासकीय जमीन प्राप्त न झाल्यानें तेथे अद्याप शासकीय वसतीगृहाचे
बांधकाम करण्यात आलेले नाही. परंतु ज्या ठिकाणी शासकीय इमारतीचे बांधकाम अपूर्ण
आहे तसेच जमीन उपलब्धते अभावी बांधकाम सुरु न झालेली अशी एकूण 49 वसतीगृहे 2011-12
या वित्तीय वर्षापासून भाड्याच्या इमारतीमध्ये सुरु करण्यात आली असल्याची
माहिती सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव
मोघे यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.
सदर
लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य सुभाष चव्हाण, वसंतराव खोटरे यांनी उपस्थित केली
होती.
No comments:
Post a Comment