Wednesday, 12 December 2012

अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या सरपंच व महिलांसाठी राखीव जागा बाबत सोडत


       जळगांव, दि. 12 :- महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील दि. 29 जून 2011 च्या पत्रान्वये जिल्हयातील ½ इतकी सरपंच पदे त्या त्या प्रवर्गाचे महिलाकरीता आरक्षित करणेबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार अनुसूचीत क्षेत्रात येणा-या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापैकी ½ पदे महिलासाठी राखीव ठेवणेबाबत देखील निर्देश आहेत. अनूसूचीत क्षेत्रातील ग्रामपंचायत सरपंच पद नियमानुसार अनु. जमातीकरीता आरक्षित असते. जळगांव जिल्हयात चोपडा, यावल,रावेर,या अनूसूचित क्षेत्रातील एकूण 27 ग्रामपंचायती आहेत. आता सुधारित तरतूदीनुसार उर्वरीत पदे महिलाकरीता आरक्षित करणेसाठी दि. 15 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 11.00 वाजता चोपडा, यावल व रावेर या तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे  होणार आहे.
            तरी यावेळी चोपडा, यावल, रावेर, तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य व नागरीकांनी वरील दिवशी उपस्थित रहावे असे अप्पर जिल्हाधिकारी जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment