जळगांव, दि. 12 :- शासन आजी / माजी सैनिकांच्या व
त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध योजना ध्वजदिनाच्या निधीतून राबवित
असते. त्यामुळे सर्व नागरिकांनी ध्वजदिन निधी संकलनाच्या कार्याला अर्थसहाय्य देऊन
सैनिकांप्रती आपल कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर
यांनी केले ते आज सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात आयोजित
ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, निवृत्त मेजर
जनरल व्ही.पी.पवार, अपर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय
निकम, निवृत्त ब्रिगेडिअर विजय नातू, निवृत्त बिग्रेडिअर व्ही.इ.घोरपडे, जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी कॅ. मोहन कुलकर्णी आदि उपस्थित होते. तसेच माजी सैनिक व
त्यांचे कुटुंबिय मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री.
राजूरकर पुढे म्हणाले , सैनिक कल्याण निधी मधून आजी / माजी सैनिक वीर पत्नी,
वीरमाता, त्यांचे पाल्य आदिवासी शासन मदत करते. तसेच विदयार्थ्यांकरिता वसतीगृह,
शिष्यवृत्ती , शहीद कुटुंबांना पाच लाख , जख्मी सैनिकांनी एक लाख त्यांच्या
कुटुंबांचे पुर्नवसन अशी मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे
यावर्षी सैनिक कल्याण विभागाकडून जिल्हयाला 63 लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
परंतु जिल्हा प्रशासनाने ते उद्दिष्ट 1
कोटी करुन आज पावेतो 95 लाख रु. निधी संकलित केला असून दोन दिवसात उर्वरित निधी
जमा केला जाणार असल्याचे श्री राजूरकर यांनी सांगितले. मागील वर्षी जिल्हयाने 91
लाख रु. निधी संकलीत केला होता सैनिकांप्रती समाजाने आदरभाव व्यक्त करुन
यावर्षीच्या निधी संकलनाच्या कार्याला सढळ हाताने मदत करावी असे आवाहन त्यांनी
केले.
सैनिक
सीमांचे संरक्षण करत असल्याने देशात शांतता राहते व शांततेतून विकासाचा मार्ग जात
असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले यांनी सांगितले त्यामुळे अशा
सैनिकांप्रती व त्यांच्या कुटुंबियांप्रती
सर्वांनी आदरभाव ठेवून निधी संकलनाच्या कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन
त्यांनी केले
प्रारंभी
जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार
घालून व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली ला.ना.विदयालयाच्या
विदयार्थ्यांनी स्वागतपर गीत गायले जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कुलकर्णी यांनी
ध्वजदिन निधीचा फ्लॅग जिल्हाधिकारी राजूरकर यांना लावला व जिल्हाधिकारी यांनी निधी
देऊन निधी संकलनाचा शुभारंभ झाला.
यावेळी
आजी माजी सैनिकांच्या पाल्यांचा प्रमाणपत्र व धनादेश देऊन मान्यवरांच्या हस्ते
सत्कार करण्यात आला. तसेच निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करणा-या सर्व शासकीय विभाग
प्रमुखांचा मानचिन्ह व भेट वस्तू देऊन मान्यवरांनी सत्कार केला. यावेळी जिल्हाधिकारी
व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील शहीद झालेल्या जवानांचा व
त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला यात (वीरपत्नी ) निर्मलाबाई रामसिंग हनुवते, (वीरमाता ) इंदूबाई पुंडलीक
पाटील, (वीरपत्नी) श्रीमती कल्पना विलास पवार, (वीरमाता ) श्रीमती अनुसया काशीराम
शिन्दे, (वीरपत्नी) श्रीमती सुरेखा पोपट पाटील, (वीरपत्नी) कविता राजू साळवे,
(वीरमाता ) श्रीमती चंद्रकला आनंदा जाधव, (वीरपत्नी) कल्पना देवीदास पाटील, (वीरपिता
) श्री. रमेश देवराम पवार, आदि
सैनिक
कल्याण विभागाने जळगांव जिल्हयाने निधी संकलनाचे 155 टक्के उद्दिष्ट पूर्तता
केल्याबद्दल जिल्हाधिकारी राजूरकर यांनी मेजर जनरल (निवृत्त) पवार, यांच्या हस्ते
ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन रतन थोरात यांनी केले तर
प्रास्ताविक व आभार कॅ. मोहन कुलकर्णी यांनी मानले.
No comments:
Post a Comment