Tuesday, 18 December 2012

गहू - हरभरा पिकांसाठी पिकविमा भरण्याची मुदत 31 डिसेंबर पर्यंत



     जळगांव, दि. 18 :- राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत रब्बी हंगामातील पिकांसाठी विशेषत: गहू, हरभरा या पिकासांठी पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. सदरच्या पिकांकरिता विमा भरण्याची मुदत 31 डिसेंबर पर्यंत असून या वर्षी टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जास्तीत जास्त शेतक-यांनी या विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के.एस.मुळे यांनी केले आहे.             
       या वर्षी राज्य शासनाने हरभरा  पिकासाठी जोखीम स्तर 60 टक्के वरुन 80 टक्के केलेला असल्याने याचा लाभ जास्तीत जास्त शेतक-यांना होवू शकतो. एकूण कमाल विमा संरक्षण रक्कम सरासरी उत्पन्नाच्या 150 टक्के पर्यत घेता येते. गहू बागायतीसाठी विमा संरक्षित रक्कम 17000/- रुपये असून त्यासाठी 1.5 टक्के विमा हप्ता रक्कम रुपये 255/- प्रति हेक्टर देय आहे. तसेच अतिरिक्त 14800/- रक्कमेचे संरक्षित अतिरिक्त पिक विमा भरुन घेता येईल असे मुळे यांनी सांगितले
       तसेच हरभरा पिकासाठी 368/- रुपये प्रति हेक्टरी भरुण शेतक-यांना विमा संरक्षण घेता येईल. त्या व्यतिरिक्त अतिरिक्त विमा संरक्षण 15600/- रुपये अतिरिक्त हप्ता भरुन घेता येईल. हरभरा, गहू पिक विमा हप्ता बॅकेकडे सादर करणेसाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर 2012 अशी असून जास्तीत जास्त शेतक-यांनी आपल्या नजिकच्या बॅकेच्या शाखेशी संपर्क साधून विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले या विषयी अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचारी अथवा तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment