मुंबई,
दि. 4 : राज्यातील शासनमान्यता प्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम
विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांची सन 2012-13 या वर्षासाठी शिक्षण शुल्क समिती, प्राधिकरण
किंवा परिषदेने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कांची
प्रतिपूर्ती करण्यास शासनाने 7 नोव्हेंबर 2012 च्या निर्णयानुसार मान्यता दिली आहे.
सन 2006-07, 2007-08, 2008-09,
2009-10, 2010-11, 2011-12 या वर्षात चालू ठेवण्यात आलेली ही योजना सन 2012-13 या
शैक्षणिक वर्षातही व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाच्या पूर्णवेळ कालावधीपर्यंत लागू राहील. तथापि
विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तर शिक्षणशुल्क व परीक्षाशुल्काची प्रतिपूर्ती करण्यात
येणार नाही.
आरोग्य
विज्ञान पदवी अभ्यासक्रमाचे वैद्यकिय, दंत, होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद, भौतिकोपचार,
व्यवसायोपचार व नर्सिंग तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत असणारे
अभियांत्रिकी, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी, एम.बी.ए.; औषधनिर्माणशास्त्र पदवी,पदविका,पदव्युत्तर पदवी एम.सी.ए. ; एच.एम.सी.टी. पदवी, पदविका, वास्तुशास्त्र पदवी ; कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत
पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच बी.एस.सी.(जैवतंत्रज्ञान); इयत्ता दहावी शालांत परीक्षा (एस.एस.सी./सी.बी.एस.सी व तत्सम)
उत्तीर्ण झाल्यानंतरचे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे पूर्णवेळ अभ्यासक्रम
इत्यादी अभ्यासक्रम या
योजने अंतर्गत आहेत.
शासनाच्या
सामायिक प्रवेश परिक्षेद्वारा (सी.ई.टी.) अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश
घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू राहील, मात्र संस्था स्तरावर घेण्यात
येत असलेल्या (Institutional Level Quota) परिक्षेद्वारा प्रवेश
घेतलेल्या विद्यार्थ्यांना लागू रहाणार नाही.
आरोग्य
विज्ञान अभ्यासक्रमासाठी शासनाच्या सामायिक प्रवेश परिक्षेद्वारा (सी.ई.टी.) प्रवेश घेतलेल्या तसेच खासगी विनाअनुदानीत
महाविद्यालयाच्या वतीने तसेच असोसिएशनमार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश
परिक्षेद्वारा (Associate CET) आणि इयत्ता
12 वी च्या गुणांच्या आधारे काही अभ्यासक्रमांसाठी (उदा.नर्सिंग) प्रवेश घेतलेल्या
विद्यार्थ्यांना लागू राहील. अनिवासी भारतीयांकरीता एकूण प्रवेश
क्षमतेच्या 15 टक्के जागा राखून ठेवल्या जातात. सदर व्यवस्थापन कोट्यामध्ये
प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यास तसेच अभिमत विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या
विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ कोणत्याही परिस्थितीत दिला जाणार नाही.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय अभ्यासक्रमात काही अभ्यासक्रमांसाठी शासनाची सामायिक परिक्षा (सी.ई.टी.)घेण्यात येत नाही. त्यावेळी
इयत्ता
12 वी च्या गुणांच्या आधारावर अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू राहील.
शालेय
शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित व कायम
विनाअनुदानित, अध्यापक विद्यालय (डी.एड.)व उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत
चालविण्यात येणाऱ्या अध्यापक महाविद्यालयांमध्ये (बी.एड.) शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित
जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण, परीक्षा
व इतर शुल्कांची प्रतिपूर्ती सध्या विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित डी.एड.
व बी.एड.
च्या अभ्यासक्रमांना शासकीय दराप्रमाणे करण्यात येते. तेथे ती पुढे चालू ठेवण्यात येईल.
आरक्षणाचा लाभ न घेता, गुणवत्तेनुसार खुल्या गटातील जागांवर प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू राहील तसेच एक दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात ए.टी.के.टी.द्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही दिली जाईल.
या योजनेचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती केली
जाणार नाही.
ही
योजना अनिवासी भारतीयांकरिता विहीत कोट्यात व्यवस्थापनामार्फत देण्यात येणाऱ्या
प्रवेशार्थीस व अभिमत विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहणार
नाही. त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण होणाऱ्या
विद्यार्थ्यांना ही सवलत लागू राहणार नाही.
हा
शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashrtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक
क्रमांक 201211071222205624 असा आहे.
No comments:
Post a Comment