*विधानपरिषद: प्रश्नोत्तरे
नागपूर, दि. 14: आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा
चालविण्यासाठी आश्रमशाळा संहिता तयार केली असून ही संहिता 2006-7 पासून लागू करण्यात आली आहे.
आश्रमशाळा संहितेतील तरतूदीनुसार बंद पडलेल्या आश्रमशाळांचे हस्तांतर करण्यात येते
अशी माहिती आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांनी विधानपरिषदेत प्रश्नाच्या
लेखी उत्तरात दिली.
सदस्य सर्वश्री रामनाथ मोते,
विनोद तावडे, भगवान साळुंके, नागो गाणार यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता.
00000
492 आश्रमशाळांच्या इमारतींसाठी जमिनी प्राप्त
--
बबनराव पाचपुते
नागपूर, दि. 14 : आदिवासी विकास
विभागामार्फत अनूसुचित जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी 552 शासकीय आश्रमशाळा
चालविल्या जातात. यापैकी 492 आश्रमशाळांच्या इमारत बांधकामासाठी जमिनी प्राप्त
झाल्या आहेत. उर्वरित 60 आश्रमशाळांच्या इमारतीच्या जागा मिळविण्यासाठी प्रयत्न
चालू आहेत. या आश्रमशाळांपैकी 189 आश्रमशाळांची कामे पूर्ण झालेली आहेत. 145
आश्रमशाळांच्या इमारतींची बांधकामे सुरु आहेत. ज्या शाळांची दुरुस्ती करणे आवश्यक
आहे अशा आश्रमशाळांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेळीच करण्याची
दक्षता क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फेत घेण्यात येते, अशी माहिती आदिवासी विकास
मंत्री बबनराव पाचपुते यांनी विधानपरिषदेत
प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
सदस्य श्रीमती विद्या
चव्हाण, सर्वश्री सतीश चव्हाण, हेमंत टकले आदींनी यासंदर्भातील प्रश्न विचारला
होता.
00000
कर चुकवेगीरी करणारे व्यापारी
शोधण्यात विक्रीकर विभागाला यश
--जयंत पाटील
नागपूर, दि. 14 : विक्रीकर
विभागातील संगणकीकरणामुळे व्यापाऱ्यांनी दाखल केलेली विवरणपत्रके व नमुना–704 मधील
लेखा परिक्षण अहवालाचे विश्लेषण करुन हवाला व त्यांचे लाभार्थी व्यापारी शोधून
काढणे शक्य होत आहे. विक्रीकर विभागाने आतापर्यंत 1555 संशयित हवाला व्यापारी
शोधले असून अंदाजे संभाव्य 1333.90 कोटी रुपयांची कर चुकवेगीरी शोधण्यात विभागाला
यश आले आहे, अशी माहिती वित्त मंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नाच्या
लेखी उत्तरात दिली.
आतापर्यंत विक्रीकर विभागाने 1555 हवाला व्यापारी शोधले असून यापैकी 1500
व्यापाऱ्यांचे नोंदणी दाखले रद्द करण्यात आले आहे व 55 प्रकरणात दाखला रद्द
करण्याची कार्यवाही सुरु आहे. 251 प्रकरणात समुपदेशन शाखेमार्फेत भेटी देणाऱ्या 55
अधिकाऱ्यांना अभिलेखावरील अनियमिततेबाबत खुलासा विचारण्यात आला असून नियमानुसार
कार्यवाही सुरु असल्याची माहितीही श्री पाटील यांनी दिली.
सदस्य सर्वश्री प्रविण पोटे, विनोद तावडे , डॉ. रणजित पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न
विचारला होता.
No comments:
Post a Comment