जळगांव, दि. 4 :- मुंबई येथील चीफ पोस्ट मास्तर
जनरल यांचे कार्यालयात दि. 17 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 11 वाजता डाक अदालत आयोजित
केली असून सदरच्या डाक अदालतीमध्ये पोस्टाच्या कामासंबंधीच्या तक्रारीचे सहा
आठवडया मध्ये निराकरण झाले नसेल अशा तक्रारींचे दखल घेतली जाणार असल्याचे
कळविण्यात येत आहे.
तरी
जळगांव जिल्हयातील नागरिकांच्या पोस्टाच्या कामासंबंधी तक्रारी असतील त्या दोन
प्रतीत सहायक निदेशक (तक्रार) तथा सेक्रेटरी डाक अदालत, चीफ पोस्ट मास्तर जनरल,
महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, मुंबई जी.पी.ओ बिल्डींग, दुसरा मजला,
मुंबई येथे पाठविण्याचे आवाहन डाक अधिक्षक जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले
आहे.
No comments:
Post a Comment