Tuesday, 11 December 2012

पार्वती देवी अपंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या खेडी बु. च्या कनिष्ठ महाविदयालयाची मान्यता रद्द


          जळगांव, दि. 11 :- महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक मंडळ नाशिक विभागीय मंडळ, नाशिकच्या कार्यक्षेत्रातील पार्वती देवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ, खेडी बु// ता.जि. जळगांव या संस्थेचे अधिनस्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खेडी बु// ता. जि.जळगांव या कनिष्ठ महाविदयालयामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा फेब्रुवारी – मार्च 2012 मध्ये केलेल्या अनेक अनियमिततांचा विचार करता, तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. जळगांव, माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग, नाशिक यांचा अहवाल तसेच दिनांक 3 ऑक्टोंबर 2012 रोजी संपन्न झालेल्या मंडळाच्या विशेष सेभेचे ठराव क्र.01 नुसार सदर कनिष्ठ महाविदयालयाची मंडळ मान्यता व सांकेतिक     क्र. जे 1509007 रद्द करण्यात आले आहे. याचे सर्व शाळाप्रमुख, विदयार्थी व पालक तसेच संबंधितांनी नोंद घ्यावी असे विभागीय सचिव नाशिक विभागीय मंडळ, नाशिक यांनी कळविले आहे.    

No comments:

Post a Comment