मुंबई, दि. 6 :
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांचे कार्य हे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दिलेल्या घटनेच्या आधारे देशातील राज्य
कारभार चालतो. त्यांच्या व्यक्तीमत्वाला शोभेल तसेच जगातील सर्व घटकांना या
स्मारकापासून प्रेरणा मिळेल असे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणार असे मत मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केले.
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिना निमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले
त्यानंतर ते पत्रकाराशी बोलत होते.
मुख्यमंत्री
म्हणाले की, संसदेमध्ये काल इंदू मिलची साडेबारा एकर जमीन राज्य शासनाकडे हस्तांतर
करण्याची घोषणा झाली त्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक
उभारण्यासाठीच्या सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. स्मारकासाठी प्राधिकरण स्थापन करुन त्यामध्ये
तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक करण्यात येणार आहे. या अगोदरसुध्दा शासनाने 2005 साली
चैत्यभूमीचे सुशोभिकरण करण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्या पार्श्वभूमीवर
प्राधिकरण स्थापन करुन जगभरातील लाखों लोक येथे नतमस्तक होऊन प्रेरणा घेऊन जातील
असे स्मारक अपेक्षित आहे. असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
यावेळी मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री
शिवाजीराव मोघे, महिला व बालविकास मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, कामगार मंत्री नसीम
खान, रोजगार हमी योजना मंत्री नितिन राऊत, खासदार एकनाथ गायकवाड, माजी मंत्री
चंद्रकांत हंडोरे, बृहन्मुबई महापालिका
आयुक्त सिताराम कुंटे, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु नरेंद्र जाधव, काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तसेच अधिकारी वर्ग व लाखो बौध्द अनुयायी उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment