Thursday, 13 December 2012

मंत्री मंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची पुनर्रचना


            मुंबई, दि. 13 : मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.  याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने 21 नोव्हेंबर, 2012 रोजी प्रसिध्द केला आहे.
            समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री असून उद्योगमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून), गृहमंत्री, वने मंत्री, ग्राम विकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम), जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे-पाटबंधारे महामंडळ वगळून), वस्त्रोद्योग मंत्री, रोजगार हमी योजना मंत्री हे या समितीचे सदस्य आहेत.
            याखेरीज बैठकीच्या विषयानुसार संबंधित मंत्री व राज्यमंत्री यांना आमंत्रित करण्यात येईल. मुख्यसचिव हे या समितीचे सचिव असून अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव (नियोजन) हे निमंत्रक आहेत.  तसेच अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव (वित्त) आणि प्रधान सचिव, सचिव (विधी व न्याय) हे या समितीचे स्थायी निमंत्रित आहेत.  इतर अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार निमंत्रित करण्यात येईल.
            हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून  त्याचा संगणक सांकेतांक 201211211652584816 असा आहे.

No comments:

Post a Comment