विधिमंडळ कामकाज : दिनांक
: 18 डिसेंबर, 2012
*विधानसभा प्रश्नोत्तरे :
खेरवाडी वांद्रे
(पूर्व) उड्डाणपुलाचे बांधकाम
18 महिन्यात पूर्ण
करणार
-
भास्कर जाधव
नागपूर दि. 18 : मुंबईतील खेरवाडी वांद्रे (पूर्व) येथील उड्डाणपुलाचे बांधकाम 18
महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे नगरविकास
राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
विधानसभा
सदस्य सर्वश्री आर.एम. वाणी, मधू चव्हाण, रविंद्र वायकर, योगेश सागर, नवाब मलिक
यांनी खेरवाडी वांद्रे (पूर्व) येथील उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला
होता. त्याला उत्तर देतांना श्री.
जाधव बोलत होते. ते म्हणाले की, मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांअर्तगत पहिल्या
टप्प्यात खेरवाडी येथील उड्डाणपुलाचा समावेश करण्यात आला होता. परंतु पश्चिम द्रुतगती मार्गावर एकाचवेळी सुरु असलेल्या
काही उड्डाणपुलामुळे होणाऱ्या संभाव्य वाहतुकीची कोंडी विचारात घेता वाहतूक विभागाने खेरवाडी येथील
उड्डाणपुलाच्या बांधकामास संमत्ती न दिल्याने या पुलाचे काम सुरु करता आले नाही.
आता या पुलाच्या बांधकामासाठी नव्याने निविदा काढण्यात आली असून येत्या 18
महिन्यांत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल.
0 0 0 0 0
राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेत
मूलभूत
बदल करणार
--
मुख्यमंत्री
राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेसाठी बँकांचा
सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे या योजनेत मुलभुत बदल करुन नव्याने योजना
तयार करण्यासंदर्भात विचार सुरु आहे. अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, सर्वश्री गोवर्धन शर्मा, नाना पटोले, देवेंद्र फडणवीस या सदस्यांनी अकोला जिल्ह्यात राजीव गांधी ग्रामीण योजनेसाठी लाभार्थ्यांना बँकांनी कर्ज नाकारल्याबात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, चांगल्या उदिष्टासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी राष्ट्रीयकृत बँकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. म्हणून या योजनेचा पुनर्विचार सुरु आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेत्यांसह सर्व पक्षीय सदस्यांच्या सूचना विचारात घेऊन योजनेत बदल केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
0 0 0 0 0
अंबरनाथ नगरपरिषद
घनकचरा व्यवस्थापन
कामाबाबत दोन
महिन्यात चौकशी करणार
-
भास्कर जाधव
अंबरनाथ नगरपरिषदेच्या घनकचरा
व्यवस्थापनाबाबत झालेल्या तक्रारीसंदर्भात दोन महिन्यात चौकशी करण्यात येईल अशी माहिती
नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात
दिली.
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, सर्वश्री
नाना पटोले, बाळा नांदगावकर, शशिकांत शिंदे या सदस्यांनी अंबरनाथ नगरपरिषदेत घनकचरा
व्यवस्थापनामध्ये झालेल्या
गैरव्यवहारासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देतांना राज्यमंत्री जाधव
बोलत होते. ते म्हणाले की, या कामासाठी जाहीर निविदा मागविण्यात आली होती.
त्यानुसार काम सुरु आहे. या कामासंदर्भात आलेल्या तक्रारीनुसार 2 महिन्याच्या आत
चौकशी करुन कारवाई करण्यात येईल.
0 0 0 0 0
अनधिकृत
बांधकामांबाबत
अभ्यास समितीचा अहवाल
लवकरच
-
मुख्यमंत्री
राज्यातील अनधिकृत बांधकामांबाबत
अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे.
अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करण्याची शासनाची भूमिका असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
विरोधी
पक्षनेते एकनाथ खडसे, सर्वश्री जितेंद्र आव्हाड, गिरीश बापट, विलास लांडे आदी सदस्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
हद्दीतील अनधिकृत बांधकामांसंदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना
मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात वाढणारे अनधिकृत बांधकाम ही अत्यंत गंभीर स्वरुपाची समस्या आहे.
अनधिकृत बांधकामांच्या विरोधात विधिमंडळाने कायदा संमत केला आहे. त्याला
राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी दिली आहे. ग्रामीण भागातील अनधिकृत बांधकामांसदंर्भात
सखोल अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या चार बैठका देखील झाल्या आहेत. लवकरच या समितीचा
अहवाल अपेक्षित आहे. अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई करण्याची शासनाची
भूमिका आहे. बांधकाम प्रक्रियेत सुलभीकरण
होणे महत्त्वाचे आहे. अनधिकृत बांधकाम निदर्शनास येऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या
महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
0 0 0 0 0
मुंबईतील 90 वर्ष
जुन्या चाळींच्या
पुनर्विकासाचा
प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन
-
मुख्यमंत्री
मुंबईतील नायगांव, वरळी, ना.म.जोशी मार्ग
आणि शिवडी मधील 90 वर्ष जुन्या
चाळींचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
विधानसभा
सदस्य मंगेश सांगळे यांनी मुंबईतील धोकादायक तसेच कालबाह्य इमारतींच्या
पुनर्विकासाबाबत प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे की, 1921 ते 1924 या
कालावधीत मुंबई शहरामध्ये कामगारांसाठी वरळी, नायगांव, ना.म.जोशी मार्ग व शिवडी
येथे 207 चाळी शासनातर्फे बांधण्यात आल्या. त्या भाडे तत्वावर वितरीत करण्यात आलेल्या
आहेत. या चाळी 90
वर्ष जुन्या असून त्यांचा
पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मुंबई विकास विभाग
(बीडीडी) चाळींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आला
होता. तथापि मंत्रालयात लागलेल्या आगीत सदर नस्ती नष्ट झाल्याने उपलब्ध
कागदपत्रांच्या आधारे धारिका पुनर्बांधणी करुन प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही
सुरु आहे, असेही
मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.
0 0 0 0 0
*विधानसभा लक्षवेधी
प्रत्येक जिल्ह्यात
टप्प्या-टप्प्याने
शासकीय महाविद्यालये
उघडणार
-
वैद्यकीय शिक्षण मंत्री
राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात
टप्प्या-टप्प्याने शासकीय महाविद्यालये उघडणार असल्याची माहिती वैद्यकीय
शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य गोपालदास अग्रवाल यांनी
विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना वैद्यकीय शिक्षण मंत्री बोलत होते.
श्री.गावित पुढे म्हणाले की, गोंदिया,
चंद्रपूर आणि बारामती येथे वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याबाबत वैद्यकिय शिक्षण संचालकांकडून
अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच या तिन्ही ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये
उभारण्यासाठी जागा उपलब्ध करण्याबाबत तसेच इतर बाबी संदर्भात महसूल आणि वित्त
विभागाकडून अभिप्राय प्राप्त झाले असून ज्या जिल्ह्यातून महाविद्यालयाची मागणी
येईल त्या मागणीचा सखोल अभ्यास करुन महाविद्यालयाची उभारणी करण्यात येईल.
लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये विधानसभा
सदस्य सर्वश्री बच्चू कडू, राजेंद्र शिंगणे आदी सदस्यांनी भाग घेतला.
0 0 0 0 0
सुजल निर्मल अभियानाचे
काम
3 महिन्याच्या आत सुरु
करणार
--
लक्ष्मण ढोबळे
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा व देऊळगाव
राजा या दोन गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी सुजल निर्मल अभियान या योजनेच्या
कामाच्या एक महिन्याचा आत निविदा काढण्यात येतील आणि 3 महिन्याचा आत काम सुरु
करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी
आज विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य राजेंद्र शिंगणे यांनी
मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना श्री.ढोबळे यांनी ही माहिती दिली.
0 0 0 0
*विधानपरिषद प्रश्नोत्तरे :
गुटखा
विक्री 18 प्रकरणात
2
लाख रुपये दंड वसूल
-
मनोहर नाईक
नागपूर
दि. 18 : गुटखा विक्री करणाऱ्या विविध 18 प्रकरणात एकूण 2 लाख रुपये इतका दंड वसूल
करण्यात आला आहे. गुटखा, पान मसाला तत्सम पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध तपास
सुरु असून तपास पूर्ण होताच अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम 2006, नियम व नियमन 2011
अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे अन्न व औषधे प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी
आज विधानपरिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
महाराष्ट्रात
20 जुलै, 2012 ते 31 ऑक्टोबर 2012 या कालावधीमध्ये रु, 10,16,85,303 इतक्या किंमतीचा
गुटखा, पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. याच
कालावधीत बृहन्मुंबई विभागात रुपये 1,58,90,807, नागपूर विभागात रुपये 66,08,752
पुणे विभागात रुपये 1,86,14,421 व नाशिक विभागात रुपये 87,83,788 इतक्या किंमतीचा
गुटखा, पानमसाला व तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. इतर प्रकरणात
हे पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. गुटखा सदृश चॉकलेट विक्रीचे कोणतेही
प्रकरण राज्यात आढळून आलेले नाही. गुटखा,
पान मसाला व तत्सम पदार्थ विक्रीबाबत गुप्तपणे माहिती प्राप्त करुन अचानकपणे
संस्थांना भेटी देऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबतीत राज्यातील सर्व
पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने
कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच परराज्यातून महाराष्ट्रात गुटख्याची
आवक होऊ नये म्हणून शेजारील राज्याच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना अन्न व औषध
प्रशासना मार्फत पत्र पाठविले आहे, अशी माहिती लेखी उत्तरात श्री. नाईक यांनी दिली
आहे.
या
संदर्भात सदस्य सर्वश्री अनिल भोसले, जयवंतराव जाधव, हेमंत टकले आदिंनी प्रश्न
विचारला होता.
0 0 0 0 0 0 0
उत्पादनाच्या खोट्या
जाहिरातींवर कारवाई
- मनोहर
नाईक
सांधे दुखीवर गुणकारी असल्याचा दावा
करणारे संधीसुधा पॉवरप्राश, शक्तीप्राश, सडपातळ होण्याची मात्रा सांगणारे स्लिमटी
आदि उत्पादनाच्या खोट्या जाहीराती प्रसिध्दी माध्यमातून प्रसारित केल्याबद्दल
अन्न व औषधे प्रशासनाने औषध व जादूटोणादी उपाय कायद्यांतर्गत ऑगस्ट 2012 ते
आतापर्यंत 88 प्रकरणांवर कारवाई केली आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर
नाईक यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
त्यापैकी आक्षेपार्ह जाहीरातीसंदर्भात
रु. 82,79,385 चा औषधी साठा जप्त करण्यात आला व रु. 71,89,902 चा औषधी साठा
प्रतिबंधित करण्यात आला आहे. आक्षेपार्ह जाहिरात प्रसिध्द केल्याबद्दल 36 प्रकरणी
न्यायालयात खटले दाखल करण्यात आहे आहेत. ओबेक्यू कॅप्सुल, हायटेक कॅप्सुल,
परफेक्स ऑईल आणि केशरोमा कॅप्सुल यांवर आक्षेपार्ह जाहिराती अंतर्गत
महाराष्ट्रातील उत्पादकांचे औषधी पाठ अनुमती रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे
उर्वरित प्रकरणी नोटीसा बजाविण्यात आल्या असून इतर संबंधितांनी जाहिरातीस प्रसिध्दी
देऊ नये, असे कळविण्यात आले आहे. श्री.
नाईक यांनी लेखी उत्तरात अशीही माहिती दिली आहे.
सर्वश्री संजय दत्त, चरणसिंग सप्रा,
अशोक ऊर्फ भाई जगताप आदि सदस्यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
0 0 0 0 0 0 0
*विधानसभा इतर कामकाज :
शाहू मिलच्या जागेवर
छत्रपती शाहू महाराजांचे
स्मारक उभारण्याबाबत
तत्त्वत: मंजुरी
-
मुख्यमंत्री
नागपूर, दि. 18 : कोल्हापूर येथील शाहू
मिलच्या जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत आज
झालेल्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आल्याची घोषणा विधिमंडळात करण्यात आली. मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत तर, विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
ही घोषणा केली.
विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री
म्हणाले की, शाहू मिलच्या जागेवर छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारण्याबाबत आज
उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, कोल्हापूरचे पालकमंत्री
हर्षवर्धन पाटील, वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान आणि सदस्यांच्या उपस्थितीत बैठक
घेण्यात आली. त्यात शाहू मिलच्या जागेवर छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक
करण्याबाबत तत्वत: मान्यता देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री
हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी, इतिहास तज्ज्ञ आणि शासकीय
अधिकारी यांची स्मारक उभारण्याबाबतची समिती नेमण्यात आली, असेही मुख्यमंत्र्यांनी
आपल्या निवेदनात सांगितले.
0 0 0 0 0
प्रमुख जिल्हा रस्ते
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे
हस्तांतरीत करणार
-
जयंत पाटील
राज्यातील प्रमुख जिल्हा रस्ते
(एमडीआर) सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे, या संदर्भात
उद्या सभागृहात घोषणा करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील
यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभेत
महसूल व वन विभाग, नगर विकास विभाग आणि ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या सन
2012-13 च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देतांना ग्रामविकास
मंत्री बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत
महाराष्ट्रातील कामे अन्य राज्यांच्या तुलनेत पूर्ण करण्यात आली आहेत. या योजनेचा
दहावा टप्पा नुकताच मंजूर करण्यात आला असून राज्याने 1 हजार 7 कोटींचा प्रस्ताव
दिला आहे. याबाबत केंद्रीय ग्रामविकास मंत्री यांची भेट घेण्यात आली आहे.
वन
विभागाच्या चर्चेला उत्तर देतांना वन मंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, राज्यात
वाघांची संख्या वाढत आहे. सध्या राज्यात 200 वाघ आहेत. वनरक्षकांची पदे भरण्याची
मागणी लक्षात घेता 100 वनरक्षकांची नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. सँक्च्युरी
एशिया यांच्यातर्फे आपल्या राज्याला ‘दि बेस्ट टायगर स्टेट’ म्हणून घोषित करण्यात
आले आहे. राज्यात 6 अभयारण्य, 1 संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यात येणार आहे.
महसूल विभागाच्या चर्चेला उत्तर देताना
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यात सुवर्ण जयंती राजस्व
अभियानाच्या माध्यमातून 40 लाख दाखले शाळेत देण्यात आले आहेत. सामान्यांना
ऑनलाईनच्या माध्यमातून अधिक गतिमान सेवा देण्यासाठी 14 नवे सर्व्हर या
महिन्यापर्यंत बसविण्यात येतील.
या
चर्चेत सदस्य सर्वश्री सुरेश धस, किसन कथोरे, प्रताप सरनाईक, कालीदास कोळंबकर,
मंगलप्रभात लोढा, नितीन सरदेसाई, मिनाक्षी पाटील, जयकुमार गोरे, गोपालदास अग्रवाल,
माधुरी मिसाळ, अबू आझमी, अशोक पवार, चंद्रशेखर बावनकुळे, संदीप नाईक, रविंद्र
वायकर, बच्चू कडू, शिशीर शिंदे आणि अनिल कदम यांनी भाग घेतला.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment