जळगांव, दि. 4 :- धुळे,नंदुरबार व जळगांव जिल्हयातील
सर्व आस्थापना, हॉटेल्स, सिनेमागृहे, कारखाने, कंपन्या , शासकीय व निम-शासकीय
कार्यालये अशासकीय कार्यालये, मंडळे, महामंडळे, बॅका, पतपेढी, व्यापारी आस्थापना,
हॉस्पिटल, सार्वजनिक उपक्रम इ. आस्थापनांमध्ये तैनात / कार्यरत असलेल्या सुरक्षा
रक्षकांचे नियोक्ता , मालक भागीदार, संचालक, व्यवस्थापक, भोगवटादार यांनी अध्यक्ष
/ सचिव, धुळे सुरक्षा रक्षक मंडळ, व्दारा सहायक कामगार आयुक्त यांचे कार्यालयात
येवून मुख्य नियोक्ता / नियोक्ता अभिकरण म्हणून नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी
न करणा-या मुख्य नियोक्ता यांचेविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जी.जे.
दाभाडे सुरक्षारक्षक मंडळ, तथा सहायक कामगार आयुक्त जळगांव व्दारा सहायक कामगार
आयुक्त यांचे कार्यालय, जळगांव यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र खाजगी सुरक्षा (नोकरीचे नियमन व
कल्याण ) योजना 2012 जळगांव, धुळे व नंदुरबार जिल्हयांसाठी दि. 21 फेब्रुवारी 2012
पासून अंमलात आलेली आहे. तसेच 5 जून 2009 च्या अधिसूचनेनुसार धुळे जिल्हा सुरक्षा
मंडळाची स्थापना झालेली असून मंडळाचे कार्यक्षेत्र जळगांव, धुळे व नंदुरबार
जिल्हयांसाठी असल्याचे श्री. दाभाडे यांनी सांगितले, सदरच्या अधिनियम व योजनेंच्या
तरतुदींच्या अंमलबजावणीकरिता सचिव व निरीक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. धुळे
सुरक्षा मंडळ करिता सचिव म्हणून शां. शि. चव्हाण यांचेकडे अतिरिक्त कार्यभार
सोपविण्यात आला आहे. तर जळगांव तालुका कार्यक्षेत्रात पी.टी. शिंपी निरीक्षक
म्हणून काम पाहतील, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर व यावल अशा सहा
तालुक्यांसाठी के.जी.पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच
अंमळनेर, चोपडा, पारोळा, एरंडोल, धरणगांव, पाचोरा, भडगांव, चाळीसगांव या
तालुक्यांसाठी एस.पी. पाटील हे निरीक्षक आहेत, असे श्री. दाभाडे यांनी सांगितले.
धुळे
सरकारी कामगार कार्यालयातील टी.एस.राठोड धुळे, शिरपूर व शिंदखेडा तालुक्याचे निरीक्षक
तर धुळे व नंदुरबार माथाडी मंडळाचे एस.आर.कुरेशी हे साक्री तालुका व संपूर्ण
नंदुरबार जिल्हयासाठी निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. त्यामुळे जळगांव, धुळे व
नंदुरबार जिल्हयातील ज्या शासकीय, अशासकीय व खाजगी आस्थापनां मध्ये सुरक्षा रक्षक
तैनात आहेत त्यांच्या मुख्य नियोक्ता अथवा नियोक्ता अभिकरणाची नोंदणी करण्याचे
आवाहन सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा सहायक कामगार आयुक्त जी.जे.दाभाडे यांनी
केले आहे.
No comments:
Post a Comment