मुंबई, दि. 13 : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कार्यरत असलेल्या विद्युत मंडळाची
फेररचना करण्यात आली असून सहा मंडळ कार्यालयांमध्ये झालेल्या भौगोलिक
कार्यक्षेत्राच्या वाटपानुसार अपिल प्राधिकाऱ्यांच्या पदनिर्देशनात सुधारणा करण्यात
आली आहे.
राज्यात उच्च दाब आणि अतिउच्च दाब ग्राहकांसाठी मुख्य अभियंता (विद्युत),
सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई, हे अपिलीय प्राधिकारी असून राज्यातील मुंबई,
नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद या सहा प्रादेशिक विद्युत मंडळांचे अधिक्षक
अभियंता हे मध्यम दाब ग्राहकांसाठी तर लघु दाब ग्राहकांसाठी विद्युत निरीक्षक हे
त्यांच्या निरीक्षणांच्या कार्यक्षेत्रात अपिलीय प्राधिकारी आहेत.
विद्युत कायदा 2003, कलम 127 अंतर्गत ही सुधारणा करण्यात आली असून याबाबतची
अधिसूचना शासनाने दिनांक 5 डिसेंबर 2012 रोजी निर्गमित केली आहे.
No comments:
Post a Comment