जळगांव, दि. 17 :- जिल्हा क्रीडा परिषदेच्या
अंतर्गत 58 वी राष्ट्रीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा दि. 9 ते 13 जानेवारी 2013 या कालावधीत आयोजित करण्यात येत
आहे. सदरची स्पर्धा यशस्वी व्हावी म्हणून शासकीय विभाग व क्रीडा संघटनांनी परस्परात
समन्वय ठेवून काम करण्याची सूचना जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केली.
आज दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी यांचे
दालनात आयोजित राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेच्या नियोजन बैठकीत श्री. राजूरकर
अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक एस.जयकुमार ,
जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुनंदा पाटील, उपशिक्षणाधिकारी श्री. गाडेकर,
क्रीडा संघटनांचे पदाधिकारी श्री.
चंद्रकांत सोनवणे , प्रशांत जगताप, प्रदीप तळवेलकर आदि उपस्थित होते.
क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी 58
व्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज
क्रीडा संकुलात होणार असल्याची माहिती देऊन सदरच्या स्पर्धेकरिता सर्व राज्यातून
संघ येणार आहेत. या स्पर्धा 14,17 व 19 वर्षे मुले / मुली करिता असून सुमारे एक
हजार खेळाडू सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले ,
सदरच्या खेळाडूंकरिता छत्रपती शिवाजी
महाराज क्रीडा संकुलात मुलींची तर नुतन मराठा व ए.टी. झांबरे विदयालयात मुलांच्या
निवासाची व्यवस्था करण्याचे बैठकीत एकमताने ठरले, तसेच खेळाडूंनी चांगले /
दर्जेदार जेवण पुरविण्याची सुचना सदस्यांनी केली तसेच यावेळी स्पर्धेच्या यशस्वी
आयोजनाकरिता विविध तांत्रीक समित्यांचे गठण करण्यात आले.
क्रीडा परिषदेला अति उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र
राष्ट्रीय सॉप्ट बॉल संघटनेकडून जिल्हा क्रीडा परिषदेला नोव्हेंबर
2012 मध्ये राष्ट्रीय सॉप्ट बॉल स्पर्धेचे
यशस्वी आयोजन केल्याबद्दल अति उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. व
सदरचे प्रमाणपत्र हे सलग दुस-यांदा जळगांव जिल्हयाला मिळत असल्याची माहिती क्रीडा
अधिकारी पाटील यांनी दिली.
No comments:
Post a Comment