Friday, 14 December 2012

विरोधी पक्षनेते ना. खडसे यांचा जळगांव जिल्हा दौरा कार्यक्रम


             जळगांव, दि. 14 :- महराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. एकनाथराव खडसे यांचा जळगांव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
           शुक्रवार दिनांक  14 डिसेंबर 2012 रोजी दुपारी 3-50 वाजता नागपूर येथुन आझाद हिंद एक्सप्रेसने मलकापुर जि. बुलडाणाकडे प्रयाण, रात्री 8-34 वाजता मलकापुर रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने कोथळी ता. मुक्ताईनगरकडे प्रयाण, रात्री 9-15 वाजता कोथळी ता. मुक्ताईनगर जि. जळगांव येथे आगमन व राखीव व मुक्काम.
           शनिवार दिनांक 15 डिसेंबर 2012 रोजी सकाळी सोयीनुसार कोथळी ता. मुक्ताईनगर जि. जळगांव येथे आगमन व राखीव व मुक्काम, दुपारी 1-00 वाजता श्री. सदगुरु नरेंद्र महाराज भक्त मंडळ, जळगांव व्दारा आयोजित आदिवासी बांधवांच्या सामुहिक विवाह सोहळयास उपस्थिती. ( स्थळ  : दुरदर्शन टॉवर जवळ, भुसावळ रोड, जळगांव), रात्री मुक्काम जळगांव.
             रविवार दिनांक 16 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 10-00 वाजता शासकीय वाहनाने मुक्ताईनगर, जि. जळगांव कडे प्रयाण, सकाळी 11-00 वाजता कोथळी, ता. मुक्ताईनगर येथे आगमन व राखीव, दुपारी 4-00 वाजता कोथळी ता. मुक्ताईनगर येथुन शासकीय वाहनाने मलकापुर जि. बुलडाणाकडे प्रयाण.

No comments:

Post a Comment