जळगांव, दि. 27 :- गिरणा पाटबंधारे
विभाग, जळगांव यांचे कार्यक्षेत्रातील मन्याड मध्यम प्रकल्पाचे जलाशयावरुन उपसा
सिंचनाने पाण्याचा लाभ घेणा-या सर्व लाभधारकांना पिण्याचे पाण्याचे आरक्षण वगळून
उर्वरित मर्यादीत पाणीसाठयातून फक्त 50 दशलक्ष घनफूट पाणी जलाशयातून उपसा सिंचनाने
पाणीपुरवठा करण्यास जिल्हाधिकारी, जळगांव यांनी मंजूरी दिलेली आहे.
त्या अनुषंगाने पिण्याचे पाण्याचे
आरक्षण वगळून रब्बी हंगाम 2012- 13 मध्ये मन्याड जलाशयातून फक्त उपसा सिंचनाने
द्राक्ष बागा व इतर फळबागा, चारा पीके, भाजीपाला, इतर बारमाही पिकांना मर्यादित
क्षेत्रास मर्यादित पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. मात्र
पाण्याचा काटकसरीने वापर होण्याच्या दृष्टीने सुक्ष्म सिंचनावर भर देण्यात यावा.
त्यासाठी काही अटींच्या पुर्ततेसह नमुना
नं. 7 अ चे पाणीअर्जावर मागणी करुन पाणी अर्ज दिनांक 7 जानेवारी 2013 च्या आत
संबंधीत पाटशाखा कार्यालयात कार्यालयीन
वेळेत प्रत्यक्ष अगर पोष्टाने देण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग जळगांव यांनी केले आहे.
* * * * * *
No comments:
Post a Comment