Friday, 14 December 2012

वनस्पती फर्स्टक्लासच्या जप्त साठयाकरिता सीलबंद निविदा पाठविण्याचे आवाहन


             जळगांव, दि. 14 :- अन्न व औषध प्रशासनच्या जळगांव कार्यालयाने मे. कोमल एजन्सी बजरंगपूरा रोड जामनेर जि. जळगंव या ठिकाणी ( वनस्पती फर्स्टक्लास ) या अन्नपदार्थाचा साठा जप्त केला असून तो अन्न सुरक्षा कायदा 2006 अंतर्गत अप्रमाणित घोषित झालेला आहे. सदर वनस्पतीचा साबण बनविणेसाठी वापर होवू शकतो. जप्त साठा मे. कोमल एजन्सी बजरंगपुरा रोड, जामनेर जि. जळगांव या ठिकाणी पाठण्यासाठी मिळू शकेल. ज्या इच्छूकांना साबण बनविणेसाठी सदर वनस्पती विकत घ्यावयाची आहे त्यांनी कार्यालयीन वेळेत सिलबंद पाकीटमध्ये दरपत्रक नमुद करुन निविदा प्रसिध्द झालेपासून 20 दिवसाचे आंत निविदा या कार्यालयास सादर करावे, असे आवाहन भ. ऊ. पाटील सहाययक आयुक्त (अन्न ) अन्न व औषध प्रशासन जळगांव यांनी केले आहे.
           जप्त केलेल्या वनस्पती फर्स्टक्लास 15 किलोचे 365 पॅक डबे व 13 किलोचा एक लुज डबा असून एकूण वजन 5 हजार 488 किलो असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यांत आले आहे
.                                                                                   

No comments:

Post a Comment