जळगांव, दि. 13 :- महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास
क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ कार्य करणा-या समाजसेविकांना जिल्हा स्तरीय पुण्यश्लोक
अहित्यादेवी होळकर पुरस्कारने सन्मानीत करण्यात येते. जळगांव जिल्हयातील चार
समाजसेविकांना सन 2007-08 ते सन 2010-11 करीता जिल्हा स्तरावरील पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहिर करण्यात आलेले आहेत यात सौ. तृप्ता अरुण जावळे,
जळगांव (2007-08), सौ.रिता भुपेंद्र बाविस्कर, अंमळनेर (2008-09), सौ.मिना सिताराम
साळी, जळगांव (2009-10) व सौ. अलका दिनकर बडगुजर, जळगांव (2010-11), यांचा समावेश
आहे.
उपरोक्त पुरस्कारार्थींना सदरचे पुरस्कार दि. 15 डिसेंबर 2012 रोजी दुपारी
4.00 वा. मुलांचे निरिक्षण गृह, (रिमांड होम) स्वातंत्रय चौक, जिल्हाधिकारी
कार्यालया समोर, जळगांव येथे जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना. गुलाबरावजी देवकर यांचे
शुभ हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. तरी सदरच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास
उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी देवेंद्र राऊत यांनी
केले आहे.
No comments:
Post a Comment