जळगांव, दि. 18 :- जिल्हयात सन 2012 – 13 या
महसूली वर्षात जिल्हयातील तापी, गिरणा, वाघूर, सुकी, गूळ इत्यादी नदीपात्रातील
वाळू स्थळांचे लिलाव / निर्गती ई – टेंडरीगं प्रक्रियेव्दारे करण्यात येणार
असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ यांनी कळविले आहे.
जिल्हयात
वाळू स्थळांची निर्गती प्रथमच ई – टेंडरींग प्रक्रियेव्दारे होणार असल्याने
त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी दि. 19 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 11 वा. अल्पबचत
भवनात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तरी मागील वर्षापावेतो वाळू स्थळांचे
कंत्राट दिलेले कंत्राटदार, इच्छूक कंत्राटदार व अन्य इच्छुक व्यक्तींनी सदरच्या
प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी जळगांव यांनी कले आहे.
No comments:
Post a Comment