Monday, 17 December 2012

दारिद्रय रेषेखालील नागरिकांना जेनरिक औषध - सुरेश शेट्टी



सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णालयांसाठी औषधांची खरेदी जेनरीक (मूळ) नावाने केली जाते. सदर औषधांच्या वितरणासाठी परिमंडळ स्तरावर रिजनल वेअर हाऊस स्थापन करण्यात आली असून जिल्हा स्तरावर जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त एकूण 74 वेअर हाऊस स्थापन करण्यात आले आहे. या वितरण व्यवस्थेव्दारे सदरची औषधे सर्व रुग्णालयांना पुरविण्यात येतात, अशी माहिती  सार्वजनिक आरोग्य  व कुटुंब कल्याण मंत्री सुरेश शेट्टी यांनी विधानपरिषदेत  लेखी प्रश्नांच्या उत्तरात  दिली आहे.
सदस्य सर्वश्री सुभाष चव्हाण, संजय दत्त, श्रीमती अलका देसाई यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

No comments:

Post a Comment