Monday, 10 December 2012

12 वी ची परीक्षा देणा-या नियमित विदयार्थ्याची प्रिलिस्ट घेऊन जाण्याचे आवाहन


         जळगांव, दि. 10 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळामार्फत फेब्रु – मार्च 2013 मध्ये घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) परीक्षेस प्रविष्ठ होणा-या नियमित विदयार्थ्यांची प्रिलिस्ट तसेच फेब्रु – 2012 परीक्षेतील उत्तीर्ण विदयार्थ्याची प्रमाणपत्रे मंडळाच्या नेहमीच्या वाटप केंद्रावर (नाशिक, मालेगांव, धुळे, नंदुरबार, जळगांव, भुसावळ, चाळीसगांव व अंमळनेर) मंगळवार दिनांक 11 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत वाटप करण्यात येणार आहे. तसेच दुरुस्त केलेली प्रिलिस्ट शनिवार दिनांक 15 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत निर्धारीत वाटप केंद्रावर स्विकारण्यात येणार आहे. याची सर्व कनिष्ठ महाविदयालय प्रमुखांनी नोंद घेवून आपला जबाबदार प्रतिनिधी अधिकार पत्रासह दिनांक 11 डिसेंबर 2012 रोजी उपरोक्त वाटप केंद्रावर प्रिलिस्ट व प्रमाणपत्रे घेण्यास पाठवावा, असे आवाहन विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ, यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment