केंद्र शासनाचा आधार नोंदणी हा एक महात्वाकांक्षी प्रकल्प
आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील
वर्षाअखेर राज्यातील सर्वांची आधार नोंदणी पूर्ण करण्यात येणार असल्याचे
मुख्यमंत्री पृथ्वीराज यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा
सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर
देतांना मुख्यमंत्री बोलत होते.
आधार
नोंदणी प्रकल्पाच्या अंमलबजावणी विषयी बोलतांना मुख्यमंत्री
म्हणाले की, राज्यात अद्यापपर्यंत चार कोटी
सोळा लाख नागरिंकांच्या आधार नोंदणीचे काम पूर्ण झाले असून आतापर्यंत सरासरी 36
टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे.महाराष्ट्र हे नोंदणीमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर
आहे. पुढील वर्षाअखेरपर्यंत राज्यातील सर्व नागरिकांची आधार नोंदणी पूर्ण करुन
राज्याला प्रथम क्रमांकावर आणण्याचे उद्दीष्ट डोळयासामोर ठेवून प्रयत्न करण्यात
येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आधार नोंदणीच्या किट्स विषयी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले
की, देशात 4 हजार किट्सद्वारे आधार नोंदणीचे काम सुरु असून यापैकी 2200 किट्सद्वारे
राज्यात आधार नोंदणीचे काम सुरु आहे. या नोंदणीमध्ये गतीमानता आणण्यासाठी आणखी
किट्सची उपलब्धता करण्यावर आणि प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे. आधार
नोंदणीच्या कामात वर्धा जिल्हा आघाडीवर असून या जिल्हामध्ये 83 टक्के जनतेची
नोंदणी पूर्ण झाली आहे. संपूर्ण राज्यात गृहनिर्माण संस्था, शाळा,महाविद्यालये,बँक्स,पोस्ट,ऑफिसच्या
माध्यमातूनही नोंदणीचे काम करण्याची परवानगी देण्यात आल्याने या कामात लक्षणिय
सुधारणा होत असल्याचे सांगून आधार क्रमांकाच्या नोंदणीच्या कामाची गती
वाढविण्याकरीता राज्यशासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यानी यावेळी
सांगितले.
लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये सर्वश्री सरदार
तारासिंग, शशिकांत शिंदे, प्रशांत ठाकूर , आणि श्रीमती माधुरी मिसाळ आदी सदस्यांनी
भाग घेतला.
No comments:
Post a Comment