जळगांव, दि. 11 :- भारत
सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयांतर्गत रोजगार आणि प्रशिक्षण महानिदेशालयातर्फे
कौशल्यविकास पुढाकार योजनेच्या रोजगारक्षम घटक कौशल्यावर आधारीत एम.ई. एस (मॉडयुलर
एम्प्लॉयएबल स्किल्स) अंतर्गत मागेल त्या व्यवसाय प्रशिक्षण योजनेतील अनुसुचित
जातीच्या (एस.सी) उमेदवारांसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम राबविण्याकरीता शासकीय
औदयोगिक प्रशिक्षण संस्था, जळगांव जि. जळगांव या संस्थेस शासनाने व्होकेशनल
ट्रेनिंग प्रोव्हायडर (व्ही.टी.पी. संस्था) म्हणुन घोषित केलेले आहे. संस्थेत
विविध व्यवसाय कोर्सेससाठी (मोडयुल्स) अल्पमुदतीचे अभ्यासक्रमाकरिता प्रवेश देणे
सुरु आहे.
या प्रशिक्षणास बेसिक इलेक्ट्रिकल
ट्रेनिंग, इलेक्ट्रॉनिक्स (रिपे. ॲण्ड मेन्टे. ऑफ पॉवर) , बेसिक वेल्डिंग (आर्क )
सप्लाय, इन्व्हर्टर ॲण्ड युपीएस, बेसिक फिटींग ॲण्ड मेझरमेंट, बेसिक ॲटोमोटिव्ह
सर्व्हिसिंग (4 व्हिलर),कॉम्प्युटर फंडामेंटल एम.एस ऑफीस ॲण्ड इंटरनेट, टर्निंग,
मिलिंग, बेसिक रेफिजरेशन ॲण्ड एअर कंडीशनिंग
No comments:
Post a Comment