मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र शासनाला विविध
संकेतस्थळांच्या योगदानासाठी असलेल्या सर्वसमावेशक
संकेतस्थळ गटातील यंदाचा 'वेब रत्न' सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय
माहिती तंत्रज्ञान मंत्री कपील सिब्बल यांच्या हस्ते नुकताच नवी दिल्ली येथे आयोजित सोहळयात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रीय माहिती व प्रसारण
मंत्रालयातर्फे ई-गव्हर्नन्सच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वेगवेगळया
राज्यांतील विविध विभागांना 'वेब रत्न'
पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतात.
माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश
अग्रवाल यांच्या पुढाकाराने गेल्या दीड वर्षांपासून राज्यात ई-प्रशासन
धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या धोरणातंर्गत वेबसाईट
तयार करतांना पालन करावयाच्या अटींची निश्चिती करण्यात आलेली आहे. शासनाच्या विविध
विभागांच्या संकेतस्थळांची निर्मिती करतांना या अटींची पूर्तता करणे सर्वांवर
बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसारच सर्व शासकीय संकेतस्थळांची
निर्मिती करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment