Tuesday, 11 December 2012

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातर्गत शेततळे, हरितगृह, शेडनेट साठी अर्थसहायय … के.एस.मुळे


                   जळगांव, दि. 11 :- जिल्हयात सदयस्थितीला टंचाई सदृश्य परिस्थीतीमुळे मोठया प्रमाणावर सामुहीक शेततलावांची गरज लक्षात घेता व कमी पाण्यावर अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी संरक्षित शेती या घटकांतर्गत हरितगृह व शेडनेट हाउस उभारणीसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान योजनेंतर्गत माहिती घटक निहाय अंदाजित प्रकल्प खर्च व अर्थसहायय देण्यात येणार असल्याची जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के.एस. मुळे यांनी दिली.
            सदरचे अर्थसहायय सामुहिक शेततळे, प्रकल्प खर्च -- , अर्थसहायय स्वरुप 500 ते 10000 घ. मी. मंजूर मापदंडाच्या 100 टक्के  रु. 056 लाख ते 4. 86 लाख मर्यादेत अर्थसहायय,  बाब – हरितगृह – प्रकल्प खर्च - रु. 935 ते रु 1465 /- प्रति चौ. मी, अर्थसहायय स्वरुप – किमतीच्या 50 टक्के कमाल क्षेत्र 4000 चौ.मी. प्रति लाभार्थी बॅक कर्जाशी निगडीत, बाब – शेडनेट हाऊस , प्रकल्प खर्च – रु 150 ते रु 367 /- प्रति चौ.मी, अर्थसहायय स्वरुप – किमतीच्या 50 टक्के कमाल क्षेत्रा 4000 चौ.मी.प्रति लाभार्थी बॅक कर्जाशी निगडीत असेल.
            अभियानाबाबत अधिक माहितीसाठी खालील कार्यालयाशी संपर्क साधावा,
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगांव, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला आकाशवाणी चौक जळगांव, उपविभागीय कृषी अधिकारी  जळगांव ,पाचोरा ,अंमळनेर तसेच सर्व संबंधीत तालुका कृषि अधिकारी, आदि त्याप्रमाणेचwww. Mahanhm.gov.in  या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment