Friday, 4 January 2013

तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनिस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन



चाळीसगांव दि. 04:- एकात्मिक बालविकास सेवा योजना (प्रकल्प नं-1), चाळीसगांव अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या रिक्त पदांसाठी तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, चाळीसगांव यांनी केले आहे.
       तालुक्यातील धामणगांव, कुंझर, खडकी बु., पाटखडकी, मेहुणबारे, वडगांव लांबे,  जामदा, खेडगांव, भोरस बु., शेवरी आणि कापडणे येथील रिक्त असलेल्या अंगणवाडी सेवीका व मदतनिस पदासाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज विक्री ही दिनांक 07.01.2013 ते 11.01.2013 या कालावधीत होणार असून सदर परिपुर्ण भरलेले अर्ज हे दिनांक 14.01.2013 ते 18.01.2013 (सुटीचे दिवस वगळुन) या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत.
सदर अंगणवाडी सेविका पदासाठी 10 वी पास व मदनिस पदासाठी 7 वी पास ही शैक्षणिक पात्रता असून स्थानिक रहिवाशी असल्याचा दाखला आवश्यक आहे. तरी तालुक्यातील अधिकाधिक उमेदवारांनी सदर पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, चाळीसगांव (प्रकल्प नं-1) यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment