Monday, 21 January 2013

महात्मा गांधी नरेगा अंतर्गत जॉबकार्ड नुतनीकरणाची 31 जानेवारी पर्यंत मुदत -- जिल्हाधिकारी



       जळगांव, दि. 21 :- सन 2008 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र अंतर्गत ज्या मजुरांनी नोंदणी करुन जॉबकार्ड घेतलेले आहे व त्या अंतर्गत काम ही केलेले आहे. अशा जळगांव जिल्हयातील सर्व जॉबकार्ड धारकांनी ग्रामपंचायतीमध्ये संपूर्ण माहिती अर्ज भरुन जॉबकार्डचे नुतनीकरण 31 जानेवारी 2013 पर्यंत करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले आहे.
      शासन निर्णय दि. 25 जुलै 2012 अन्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत जॉबकार्ड नुतनीकरणास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे सन 2008 पासून आजपावेतो किमान एकदा महात्मा गांधी नरेगात काम केलेल्या मजुरांचे जॉबकार्ड नुतनीकरणाची मोहिम जळगाव जिल्हयात हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजूरकर यांनी दिली या मोहिमेंतर्गत प्रत्येक गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात जॉबकार्ड धारकाचा नमुना 1 चा अर्ज भरुन घेणे, शासकीय खर्चाने कुटुंबाचे छायाचित्र काढणे व कुटुंबांना नवीन जॉबकार्ड वितरीत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
      तसेच 1 फेबुवारी 2013 पासून पूर्वीचे जुने जॉबकार्ड शासन परिपत्रक 13 डिसेंबर 2012 अन्वये अवैध ठरविण्यात आले आहे. तरी जळगांव जिल्हयातील अकुशल मजूर / बेरोजगार / कुटुंबांनी आपल्याकडील जॉबकॉर्डचे 31 जानेवारी पर्यंत नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment