जळगांव,
दि. 22 :- जिल्हयातील सेवा निवृत्त सैनिक
अधिकारी, माजी सैनिक / विरपत्नी / माजी सैनिक विधवा यांना कार्यालय रक्षा लेखा प्रधान
नियंत्रक (पेन्शन) अलाहाबाद (PCDA Allahabad) यांचेकडून दिनांक 17 जानेवारी 2013
रोजीच्या सर्क्युलर क्रं 500, 501,502,503,504,505 अन्वये सुधारीत पेन्शन वाढीचा
तपशिल व इतर पेन्शन विषय विशेषत: पुनर्नियुक्त दिवंगत माजी सैनिक विधवा यांच्या
दोन कुटुंब निवृत्ती वेतन (एक सैन्य सेवा व दुसरी नागरी सेवा ) बाबतची माहिती
जाहीर करण्यात आलेली आहे. सदरची माहिती www.pcdapension.inc.in या वेब साईटवर उपलब्ध आहे. तरी जळगांव
जिल्हयातील सेवा निवृत्त सैनिक अधिकारी / माजी सैनिक / विरपत्नी/ माजी सेनिक विधवा
पत्नी यांना आपल्या निवृत्ती वेतनाविषयी काही अडचणी असल्यास किंवा उपरोक्त विषयी
अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय (फोन क्रं 0257-2241414)
जळगांव येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडून करण्यात
येत आहे.
* * * * * *
No comments:
Post a Comment