नाशिक दि.07:
- राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज पुरस्कारांतर्गत प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत पिंपळखुटा ता.
अक्कलकुवा जिल्हा नंदूरबार (रक्कम रू. 10 लक्ष), व्दितीय पुरस्कार ग्रामपंचायत जखाणे
तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे (रक्कम रू. 08 लक्ष), तृतीय पुरस्कार विभागून
ग्रामपंचायत रायतेवाडी, ता. संगमनेर जिल्हा अहमदनगर व नरवेल ता. मुक्ताईनगर जिल्हा
जळगाव या ग्रामपंचायतींना घोषित करण्यात आले.
साने
गुरूजी स्वच्छ प्राथमिक शाळा पुरस्कार रक्कम रू. 1 लक्ष व सावित्रीबाई फुले स्वच्छ
अंगणवाडी पुरस्कार रक्कम रू. 50 हजार नाशिक जिल्ह्यातील ओढा या ग्रामपंचायतीस
प्राप्त झाला.
विशेष पुरस्कारांतर्गत देण्यात येणारे
स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार (कुटूंब कल्याण) ग्रामपंचायत रायतेवाडी ता. संगमनेर जिल्हा
अहमदनगर (रक्कम रू. 30 हजार), स्व. वसंतराव नाईक पाणी व सांडपाणी व्यवस्थापन
पुरस्कार रक्कम रू. 30 हजार जखाणे ग्रामपंचायत ता. शिंदखेडा जिल्हा धुळे, सामाजिक
एकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार रक्कम रू. 30 हजार ग्रामपंचायत होळ ता.
शिरपूर जिल्हा धुळे या ग्रामपंचायतींना मिळाले.
शाहु,
फुले, आंबेडकर स्वच्छ दलित वस्ती पुरस्कार रक्कम रू. 10 लक्ष प्रथम पुरस्कार निंबळक
तालूका जिल्हा अहमदनगर या ग्रामपंचायतीस जाहिर करण्यात आला.
सन
2011-12 च्या विभागस्तरावर देण्यात येणारे पुरस्कार कोकण विभागाचे विभागीय आयुक्त,
श्री. विजय नाहाटा यांनी घोषित केले. यावेळी सर्वश्री नाशिक विभागीय आयुक्त
रवींद्र जाधव, कोकण विभागाचे उपायुक्त (विकास) प्रकाश देवऋषी, नाशिक विभागाचे
उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुढेवार, विभागीय समाजकल्याण अधिकारी याशवंत मोरे,
प्रतिनिधी मुंबई मंडळाचे उपसंचालक (शिक्षण) बी. डी. कनोज, शांतीवन नेरे, पनवेल या
स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी शिवाजी बार्शी, पत्रकार, पनवेल व्ही. डी. पाटील, सहाय्यक
प्रशासन अधिकारी, विकास शाखा कोकण भवन श्रीमती ए. एच. धनमेहेर आदी अधिकारी व सर्व
पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment